पुणे कार अपघात : बाप आणि मुलगा आज दोन वाजता कोर्टासमोर

0

 

पुणे लोकशाही न्युज नेटवर्क –

पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. या अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा हे दोघे तरुण-तरुणी मृत्युमुखी पडले. याप्रकरणी अल्पवयीन कारचालक वेदांत अग्रवाल याचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, या अपघातानंतर अवघ्या ५ तासांत अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला. घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त होत असल्याने आता पुणे पोलीसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘एफआयआरमध्ये ५ आरोपी होते, त्यापैकी ३ आरोपींना आम्ही रात्री उशिरा अटक केली. त्यांना आम्ही न्यायालयात हजर करू. बाल हक्क न्यायालयाने हिट अँड रन प्रकरणातला आरोपीला सज्ञान म्हणून खटला चालवायची परवानगी दिल्यास पुणे पोलीस तातडीने त्याला अटक करणार आहेत. पुणे पोलिसांनी वकिलांमार्फत आरोपीला नोटीस पाठवली आहे. न्यायालयात हजर न राहिल्यास फरार घोषित करण्याची कारवाई करणार असल्याचा नोटिशीत उल्लेख आहे’, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे पुणे अपघात प्रकरणात आज सर्वात मोठी घडामोड घडणार आहे.

 

आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयासमोर आज दुपारी २ वाजता हजर केले जाणार आहे. तसेच आरोपीचा फॉरेन्सीक रिपोर्ट देखील येणार आहे. अल्पवयीन आरोपीवर दाखल केलेल्या गुन्ह्यात कलमं देखील वाढवली आहेत. आरोपीवर मोटार वाहन कायद्यातील १८५ च्या अंतर्गत नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १८५ कलमानुसार दारु पिवून गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी हा गुन्हा दाखल करण्यासाठी दोन दिवस लावले. ज्या दिवशी अपघात झाल्या त्याच दिवशी गुन्हा दाखल करायला हवा होता असं नागरिकांचं म्हणणं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.