सराफ दुकानातील दरोडा प्रकरणी एकाला पुण्यातून अटक

0

जळगाव : सराफ बाजारातील दुकानात -पहाटेच्या सुमारास तीन दुचाकीवरुन आलेल्या सहा दरोडेखोरांनी  सशस्त्र दरोडा टाकला. त्याठिकाणाहून दरोडेखोरांनी ३२ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. दरोडा टाकणाऱ्यांपैकी एकाला पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी करुन त्याचा इतर साथीदारांचा शोध घेतला जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

शहरातील सराफ बाजारात भवानी मंदिराशेजारी असलेल्या सौरभ ज्वेलर्समध्ये सोमवारी पहाटेच्या सुमारास तीन दुचाकीवरुन आलेल्या सहा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. याठिकाणाहून दरोडेखोरांनी २५ लाख ४७ हजारांचे सोन्याचे दागिने, ६ लाख ५० हजारांची चांदीचे दागिने व ३२ हजारांची रोकड असा एकूण ३२ लाख २९ हजार ५७४ रुपयांचा ऐवज घेवून दरोडेखोर पसार झाले होते. या घटनेमुळे सराफ व्यावसायीकांमध्ये खळबळ माजून गेली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांची मिटींग घेवून त्यांना तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा, शनिपेठ पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनामिळालेल्या माहिती आधारावर ही पथके संशयितांच्या शोधार्थ वेगवेगळ्या दिशेने रवाना झाली होती.

दरोड्यातील एक संशयित पुण्यात असल्याची माहिती एका पथकाला मिळताच त्यांनी पुण्यातून एका संशयिताला ताब्यात घेतले. तसेच जळगावातून देखील अन्य दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसांकडून या संशयितांची कसून चौकशी करण्यात येत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.