एन्काऊंटर स्पेशालिस्ट वादग्रस्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांचा जामीन मंजूर !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

एन्काऊंटर स्पेशालिस्ट आणि माजी वादग्रस्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. अँटालिया स्फोटकं प्रकरणात त्यांना अटक झाली होती. तेव्हापासून प्रदीप शर्मा जेलमध्ये होते. आता सुप्रीम कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. अँटालिया स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा आरोपी आहे. २०२१ मध्ये प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते. याआधी हायकोर्टाने त्याचा जामीन फेटाळला होता. मात्र, शर्मा यांच्याकडून पुन्हा जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता.

गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेतली. सुनावणीनंतर कोर्टाने या संदर्भात निकाल राखून ठेवला होता. आज म्हणजेच मंगळवारी कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे प्रदीप शर्मा हे लवकरच तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता आहे. २५ फेब्रुवारी २०२१ ता दिवशी उद्योगपती मुकेश अंबानी यांचं निवास्थान असलेल्या अँटालिया या इमारतीबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ आंधळी होती. या घटनेनंतर स्कॉर्पिओ मालक मनसुख हिरेन याचा मृतदेह ठाण्याजवळ खाडीत आढळला होता.

एप्रिल २०२१ मध्ये हा तपास एनआयएने ताब्यात घेतल्यावर तत्कालीन एपीआय सचिन अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रदीप शर्मासह ९ जणांना एनआयने अटक केली. प्रदीप शर्मांनी बसेल पुरावे मिळवायला मदत केली असा ठपका त्यांच्यावर होता.

Leave A Reply

Your email address will not be published.