पो.हे.कॉ प्रल्हाद शिंदे (मेजर) सेवानिवृत्त

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

चाळीसगाव येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयात कार्यरत असलेले पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रल्हाद भाऊराव शिंदे मु. पो तरवाडे ता. चाळीसगाव जि. जळगाव हे पोलिस खात्यातून दि. 30 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाले.

सन 1984 या वर्षी ते आर्मीत भरती झाले होते. आर्मीतून 2002 मध्ये रिटायर झाले. त्यानंतर 2006 मध्ये पुन्हा जळगाव जिल्हा पोलीस दलात भरती झाले. अशी आर्मीमध्ये अठरा वर्ष व पोलीस खात्यात सोळा वर्ष अशी एकूण 34 वर्ष सेवा करून ते दि. 30 रोजी सेवानिवृत्त झाले. आर्मीत सेवा करीत असताना आर्मीमध्ये त्यांनी युनिक्स ऑपरेटिंग सिस्टममध्ये मेसेज देवाणघेवाणीचे सॉफ्टवेअर बनवले होते. त्या अनुषंगाने त्यांना चीफ ऑफ आर्मी स्टाफ यांचेकडून प्रशंसा पत्र मिळाले होते.

तसेच पोलीस दलात त्यांनी क्राईम विभागामध्ये काम करून क्लिष्ट आणि गुंतागुंतीचे गुन्ह्यांमध्ये तपास केला. तसेच वाळू तस्करांविरुद्ध एम.पी.डी. ए. व मोक्का गुन्ह्याच्या तपासात भाग घेतला आहे. त्यांनी भडगाव पोलीस स्टेशनला अधिक काळ सेवा बजावली असून क्राईम दप्तरी काम करून बऱ्याच गुन्ह्यांचा तपास केला. एक माजी सैनिक असून देखील पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी प्रल्हाद शिंदे (मेजर) यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.