सशस्त्र दरोडा, व्यावसायिकाला १७ लाखांत लुटले

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

तीन दरोडेखोरांनी सराफा व्यावसायिकाला अडवून धारदार वस्तूने वार करून त्यांच्याजवळील सोन्या-चांदीचे दागिने आणि ८ लाख रुपयांची रोकड असा एकूण १७ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जबरी लुटल्याचा धक्कादायक प्रकार मुक्ताईनगर तालुक्यातील नरवेल फाटाजवळ घडला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश वसंत सोनार (वय ३२, रा. नरखेल ता. मुक्ताईनगर जि. जळगाव) हे सराफ व्यावसायिक आहे. त्यांचे मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे धनश्री ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. बुधवार ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास निलेश सोनार हे त्यांचे दुचाकीने उचंदा येथील दुकान बंद करून घरी जात होते. त्यावेळेस नरखेल फाट्याजवळ अज्ञात तीन दरोडखोरांनी दुचाकीवर येऊन त्यांचा रस्ता अडविला.

दरम्यान निलेश सोनार यांना धारदार शस्त्र व दगडाने मारहाण करून त्याच्याजवळील १ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ८० हजार रुपये किमतीचे दोन किलो चांदीचे दागिने आणि ८ लाख रुपयाची रोकड असा २७ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरी लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

याप्रकरणी सराफा व्यावसायिक यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.