खळबळजनक; पंतप्रधान मोदींना हल्ल्याची धमकी, केरळ दौऱ्यादरम्यान मोदींना टार्गेट करण्याचा इशारा

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) हल्ला होण्याची शक्यता आहे. एका पत्राद्वारे त्यांना धमकी देण्यात आली आहे. केरळ दौऱ्यादरम्यान मोदींना टार्गेट करण्याचा इशारा या पत्रातून देण्यात आल्याचा दावा केरळचे भाजप प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी केरळातील पहिल्या वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटन कार्यक्रमाला जाणार आहेत. सुरेंद्रन म्हणाले, “PM मोदींवर हल्ल्याचं पत्र कोचीमधील एका व्यक्तीनं मल्याळम भाषेत लिहिलं आहे. हे पत्र एक आठवड्यापूर्वी भाजपच्या कार्यालयाला प्राप्त झालं आहे. हे पत्र पोलीस महासंचालकांकडं सुपूर्द करण्यात आलं आहे”

 

मीडिया रिपोर्टनुसार, “पोलीस अधिकाऱ्यांनी एन. के. जॉनी (N. K. Johnny) नावाच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असून ज्याच्या पत्त्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला होता. या पत्रामध्ये मोदींना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासारखेच उडवण्याची धमकी देण्यात आली होती. जॉनी हा कोचीचा रहिवासी असून आपण हे पत्र लिहिलं नसल्याचं त्यानं म्हटलं आहे”

Leave A Reply

Your email address will not be published.