पी.जी. महाविद्यालयात स्नेहसंमेलन रिदम उत्साहात

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

के. सी. ई च्या पी.जी. महाविद्यालयाचे रिदम स्नेहसंमेलनाच्या शेवटच्या दिवशी नृत्यासह, गायन,अंताक्षरी स्पर्धांनी रंगत आणली. उद्घाटन मु. जे. महाविद्यालयाचे प्रा. के. बी.महाजन यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ. व्ही.एस. झोपे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा. संदीप पाटील स्नेहसंमेलन समन्वयक प्रा. डी. आर. न्हावी ,प्रा.आर एम पाटील उपस्थित होते.

गणेश वंदना, घुमर रे, लगन लगी, यासह आदिवासी,लावणी व पारंपारिक नृत्य सादर झाले. यासह पारंपारिक गीते विद्यार्थ्यांनी गायले. नाट्य तसेच मिमिक्रीदेखील स्नेहसंमेलनात सादर झाली. अंताक्षरी स्पर्धेत चार संघ तयार करण्यात आले होते.चित्रपटातील
गीतांमुळे स्पर्धेत रंगत आली. केसीईचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आर. टी. महाजन उपस्थित होते. सायली नारखेडे हिला बेस्ट मायक्रोबायोलॉजिस्ट चा पुरस्कार देण्यात आला. तर सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील समाधान माळी व रसायनशास्त्र विभागातील महिपाल सिंग राजपूत यांना बेस्ट स्टुडंट पुरस्कार देण्यात आला. महाविद्यालयातील प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉ. व्ही. एस. झोपे , कै. श्रीपत अवसू झोपे कै.जनाबाई श्रीपत झोपे या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.डॉक्टर स्नेहल देशमुख यांना पीएचडी प्राप्त केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. याशिवाय क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम व अविष्कार मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.