फिजिओफिस्ट २०२३ ऑस्कर नाईट उत्साहात

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन फिजिओफिस्ट २०२३ ऑस्कर नाईट थाटात संपन्न झाले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, डी एम कॉर्डीओलॉजीस्ट डॉ. वैभव पाटील, अधिष्टाता डॉ. एन एस आर्विकर, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, डॉ उल्हास पाटील होमीओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी बी पाटील, गुणवंतराव सरोदे आयुर्वेदीक महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ. हर्षल बोरोले, गोदावरी नर्सिंगच्या प्राचार्य मौसमी लोंढे, डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरेपीचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर यांचेसह विविध मान्यवर उपस्थीत होते.मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. फिजीओफिस्टचे सूत्रसंचालन बुशरा, महाविश, डॉ.कृतिका, अंकित, ओंकार, अंकिता, सलोनी, सुमेधा, श्रृती, आरती यांनी केले. मान्यवरांनी उपक्रमाचे कौतुक करुन पूर्णवेळ उपस्थीत राहून कार्यक्रमातील विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.

यावेळी वेलकम डान्स डॉ.कृतिका व दृश्टी पोपट यांनी तर अंकितने व्हिडीओ सादर केला. फोकडान्स प्रथम वर्ष बॅचमधील स्नेहा, अपूर्वा, शारण्या, वैष्णवी, सोलो सिगिंग मृण्मयी बोरसे, गृप डान्स चतुर्थ वर्षातील उत्कर्ष, वृंदा, अनुजा, दिपक, कल्याणी, साक्षी, आदित्य, सोलो डान्स प्रथम वर्षाची वैष्णवी दालवे, गृप डान्स अक्षता, सुरक्षा, मुस्कान, बीट बॉक्सिंग अंकित, आदित्य बच्चछाव, सोलो डान्स व सिगिंग अनुक्रमे चर्तुथ वर्षातील दर्पण चौधरी, वृंदा सोनवणे आणि स्किट पीजीच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी सादर केले. गृप डान्स द्वितीय वर्षातील अंक्षिता, जान्हवी, भुमिका, मेहेक,सेजल, ऐश्‍वर्या, श्वेता, ड्युट डान्स तृतीय वर्षातील खुशी आणि प्रतिक यांनी केला. सोलो डान्स द्वितीय वर्षातील ासक्षी महाजन, सिगिंग प्रथम वर्षातील अश्विनी नाईक, गृप डान्स सोहम, निकितेष, उत्कर्ष, विशाल, यश, दिपक, प्रथमेश व द्वितीय वर्षातील कृतिका, दिव्या, अश्विनी यांनी केला. गृपडान्समध्ये द्वितीय वर्षात्ील लाची, साक्षी, ठाकरे, आकांक्षा, समिक्षा, चतुर्थ वर्षात्ील दर्पण, मयुर, स्वप्नील, ओंकार, सुरज, अमन, सागर तर सोलो डान्स चतुर्थ वर्षातील अंकिता शुक्‍ला, आदिती, कोमल, जान्हवी, गिरीजा, सृष्टी, युतीका, तृतीय वर्षातील स्नेहल राठोड यांनी तर मिमिक्री प्रथम वर्षात्ील अश्विनी नाईक, सालाले सिगिंग चतुर्थ वर्षातील आर्या पाटील, ड्यूट डान्स द्वितीय वर्षातील साक्षी जाधव, रोशनी, इंटर्न यशश्री साळवी, गीतगायन िइद्वतीय वर्षातील प्रियदर्शनी आणि प्रतिक्षा, सोलो बेली डान्स प्रथम वर्षातील आयुषी, गृप डान्स इंटर्न समृद्धी, श्रेयस, सृष्टी, सिद्धी यांनी केला

Leave A Reply

Your email address will not be published.