पेट्रोल-डिझेलचे पुन्हा दर कडाडले; मोजावे लागणार इतके रुपये

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. गँस सिलेंडर, कच्चे तेल, दूध, औषधी अशा अनेक वस्तू महाग होताय. त्यातच आणखी एक भर पडली. पुन्हा पेट्रोल – डिझेलचे दर कडाडले आहेत. यामुळे सामान्य जनता चांगलीच बेजार झाली आहे.

भारतीय तेल कंपन्यांनी (IOCL) आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ केली असून आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. मंगळवारी देशात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price) कडाडलं आहे. आज पेट्रोलच्या दरांत 84 पैसे प्रति लिटर, तर डिझेलच्या दरांत 74 पैशांची वाढ झाली आहे.

आजच्या दरवाढीनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलच्या दरांत प्रति लिटर 84 पैशांची तर डिझेलच्या दरांत 74 पैशांची वाढ झाली आहे. तर दरवाढीनंतर देशाच्या राजधानीत पेट्रोल 100.21 रुपये आणि डिझेल 91.47 रुपयांवर पोहोचलं आहे.

तेलाच्या किमतीत गेल्या 7 दिवसांत झालेली ही सहावी वाढ आहे. तेल कंपन्यांनी 22 मार्चपासून (24 मार्च वगळता) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करणं सुरूच ठेवलं आहे. अशाप्रकारे सात दिवसांत पेट्रोल 4.40 रुपयांनी महागलं आहे. तर डिझेल 4.55 रुपयांनी महागलं आहे.

कोलकात्यात आज पेट्रोलचा दर 108.01 रुपये प्रति लिटरवरून 108.53 रुपयांवर पोहोचले आहेत. तर कोलकात्यात डिझेल 93.57 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. चेन्नईबद्दल बोलायचं झालं तर, आज एक लिटर पेट्रोल 104.43 रुपये प्रति लिटरवरून 104.90 रुपयांवर पोहोचलं आहे. तर डिझेल 95.00 रुपये प्रति लिटरनं मिळत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here