पाटबंधारे विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची आत्महत्या

0

जळगाव : पाटबंधारे विभागात नोकरीस असलेल्या योगेश गोविंद रंधे (वय ४५, रा. नागेश्वर कॉलनी) यांनी राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील मूळचे रहिवाशी असलेले योगेश रंधे हे आपल्या परिवारासह शहरातील नागेश्वर कॉलनीत पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होते. तापी पांटबंधारे विभागात शिपाई म्हणून नोकरी करुन आपल्या कुटुंबियांचा उदनिर्वाह करीत होते. मध्यरात्रीच्या सुमारास घरातील सर्वजण झोपलेले असतांना योगेश रंधे यांनी मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना बुधवार दि. ६ मार्च
रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीला आले. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

सकाळच्या सुमारास कुटुंबियांना जाग आली असता, त्यांना योगेश रंधे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. यावेळी त्यांनी हंबरडा फोडीत आक्रोश केला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेत, रंधे यांचा मृतदेह तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय
अधिकाऱ्यांनी मयत घोषीत केले.

घटनेची माहिती मिळताच रंधे यांच्या कुटुंबियांसह मित्रांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी याठिकाणी आक्रोश केला होता. योगेश रंधे यांच्या पश्चात पत्नी शालिनी, मुलगा विवेक आणि मुलगी भूमिका असा परिवार आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.