मनाला नियंत्रीत ठेवण्यासाठी पर्युषण पर्व उत्तम काळ…

0

 

◇◇ प्रवचन सारांश – 24/08/2022 ◇◇

 

पर्युषणपर्व मनाला, कर्माला नियंत्रित ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ‘कर्म को शर्म नही’ असे म्हंटले जाते.
“तपेश्वरी सो राजेश्वरी,राजेश्वरी सो नरकेश्वरी।” असे होऊ शकते असे सांगून अंतढसूत्रचे वाचन का करावे त्यापासून काय लाभ होतात
प.पू. डॉ. पदमचंद्र महाराज साहेब यांनी आजच्या प्रवचनात उपदेश दिला. 24 ऑगस्ट पासून पवित्र पर्युषण पर्व आरंभ झाला त्याच्याबाबत त्यांनी आपल्या प्रवचनात सांगितले.

जियो और जियोच्या तत्त्वानुसार जैन धर्माची ओळख आहे. प्रवचना आधी अंतढसूत्रचे वाचन करण्यात आले. या आठ दिवसांत 90 महापुरुषांचे कार्य तसेच ते मोक्ष पदापर्यंत कसे पोहोचले याचे उपस्थित श्रावक श्राविकांना महत्त्व समजणार आहे.
‘क्षमा वीरस्य भूषणम’
जैन धर्म हा वीरांचा धर्म आहे. जो मनाने बलवान आहे तोच समोरच्याला माफ करू शकतो. कमजोर व्यक्ति माफ करू शकत नाही. अंतढसूत्र मध्ये स्त्रियांच्या 64 आणि पुरुषांच्या 72 कलाविषयक पण सांगण्यात आलेले आहे. या पर्युषण काळात आध्यात्मिक गोष्टीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

जय गच्छाधिपती 12 वे पट्टधर परमपूज्य पार्श्वचंद्रजी महाराज साहेब आदीठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात जळगाव येथील स्वाध्याय भवन येथे चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे. या अंतर्गत आजपासून 8 दिवसांचा पर्युषण पर्वाचा पवित्र असा काळ सुरू झालेला आहे. त्यानिमित्ताने विशेष प्रवचन, धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.
………………………..

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

Leave A Reply

Your email address will not be published.