पारोळा येथे अंध खेळाडूंच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धां आरंभ

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

पारोळा शहरातील बस स्टॅन्ड मागील सावित्रीबाई स्टेडियमवर अंध व अपंग संघाच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांना आज सुरुवात झाली. जळगाव विद्या महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघ यांच्यावतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक रोहन मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत जळगाव, मुंबई, अमरावती, पुणे, लातूर, नागपूर, या संघांनी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला आहे. दिनांक २६ व २७ फेब्रुवारी असे दोन दिवस ही राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहे. असल्याची माहिती आयोजकांनी दिली, पहिला सामना जळगाव व मुंबई या संघात दरम्यान झाला. या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाला प्रथम बक्षीस म्हणून सात हजार रुपये तर उपविजेत्या संघाला पाच हजार रुपये बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

मॅन ऑफ द मॅच ला पाचशे रुपये व मॅन ऑफ द सिरीजला एक हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. तसेच सहभाग नोंदवणाऱ्या प्रत्येक संघाला प्रोत्साहनपर पंधराशे रुपये रोख बक्षीसही दिले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र अंध संघाचे राज्य प्रवक्ता ज्ञानेश्वर आहेरकर, अपंग संघटनेचे राज्याध्यक्ष रविंद्र पाटील, अंध संघटनेचे राज्याध्यक्ष हर्षद चक्रधर, महासचिव जीवन मराठे, कोषाध्यक्ष राहुल सिंग, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे, योगेश पाटील, लक्ष्मीकांत भिल, वसंत पवार, राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयचे उपप्राचार्य प्रा.डॉ. संजय भावसार प्रा.डॉ. शैलेश पाटील, जयवंत चौधरी, राजू महाजन, पलटी भाऊ, राकेश करोसिया यांच्यासह शहरातील मान्यवर या वेळी उपस्थित होते.

पहिला सामना जळगाव व मुंबई यांच्या अतिशय रोमांचकारी ठरला. अंध खेळाडू डोळस असणाऱ्यांनाही लाजवेल असा अप्रतिम खेळ या दोन्ही संघातील खेळाडूंनी केला. त्यांचा खेळ पाहण्यासाठी पारोळा शहरातील अनेक क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.