उत्रड येथे आदिवासीच्या घराला आग, कोंबड्या व संसारोपयोगी साहित्य जळून खाक

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील उत्रड शिवारातील दुलसींग सुक्राम भिल यांचे स्वतःच्या शेतातील टेकडीवर बांधलेल्या झोपडीला आज पहाटे दीड ते दोन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली.

आग लागल्याने झोपडीतील ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ यासह संसार उपयोगी साहित्य व रोख रक्कम सोन्याचे दागिने कोंबड्या यासह पारडू असे जळून खाक झाले. तसेच दुलसींग यांच्या पत्नीच्या साडीला आग लागली होती. यावेळी त्यांच्या पतीने वाचवल्याने त्या थोड्या प्रमाणात जळाल्या.

याबाबत उत्रड,हिरापूर गावात सदर माहिती पोहोचतात गावकऱ्यांनी धाव घेतली. यावेळी घटनास्थळी तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलिस पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला. तर याबाबत पारोळा पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्याचे काम सुरू होते.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.