तरवाडे येथे तरूण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

0

पारोळा , , लोकशाही न्यूज नेटवर्क
पारोळा तालुक्यातील तरवाडे येथील २२ वर्षीय तरुण शेतकऱ्याने त्याच्या स्वतः च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार, दि. २ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. मंगेश धरमसिंग पाटील (वय २२) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, मंगेश धरमसिंग पाटील (वय २२) याने त्याच्या तरवाडे शिवारातील शेतात निंबाच्या झाडाला दोरीने गळपास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला चंदू भगवान पाटील रा, तरवाडे यांनी खबर दिल्याने पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक फौजदार जयवंत पाटील हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.