माविआच्या काळातील कारनाम्यांचा मुख्यमंत्र्यांनी वाचला पाढा !

1

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत ‘मविआ’ सरकारचा पाढाच वाचून दाखविला . यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार असतांना रवी राणांच्या पत्नीला आत घातले. कंगना राणावतचे घर तोडले. गिरीश महाजन, नारायण राणे, देवेंद्र फडणवीसांच्या कुटुंबाची चौकशी लावली. आशिष शेलारांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाला. आपण असे केले. काय? जयंतराव मला माहिती आहे. दादांनाही माहिती आहे. असे प्रकार केले. हे जास्त काळ चालत नसल्याचे सुनावले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, तुम्ही गुन्हा न करता मॉलमध्ये जाऊन माणसांना माराल, असे कसे होईल. जितेंद्र आव्हाड आपले चांगले मित्र आहेत. मात्र, सुप्रीम कोर्टाने आपली दखल घेऊन तपास करण्याच्या पोलिसांना सूचना केल्यात. मोठ्याने बोलले म्हणून सत्य लपत नाही, असा टोला त्यांनी लगावला .

सरकारकडून ७५ हजार नोकऱ्या भरती भरण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लगेच नियुक्त्या देत आहोत. पोलिस भरती प्रगतीपथावर आहे. कौशल्य विकास मेळावे जोरात सुरू आहेत, असा दावा त्यांनी केला.

1 Comment
  1. Dharmendra Badgujar sir says

    अंगावर आले तर शिंगावर घ्यावेल लागते याच्यात विशेष काय आहे ? आपला अपमान कोन सहन करून घेईन

Leave A Reply

Your email address will not be published.