शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे…

0

 

जळगाव,  लोकशाही न्युज नेटवर्क:

शहराचा पाणीपुरवठा हा एक दिवस उशिराने होणार आहे. दरम्यान शहराचे पाणी पुरवठा करणाऱ्या वाघुर पंपीग स्टेशन येथे विज पुरवठा करणारी ३३ केव्ही उच्चदाब विज वाहीनीवरील विद्युत पुरवठा दिनांक २८/०९/२०२२ रोजी सकाळी १०.१५ वाजेपासून खंडीत झालेला असल्यामुळे. सदरचे विद्युत पुरवठा दुरुस्तीचे काम महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीकडून युद्ध पातळीवर करण्यांत येत असल्याची माहिती मिळाली आहे.

परिणामी वाघुर पंपींग स्टेशन येथील विज पुरवठा अभावी बंद आहे. तरी जळगांव शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात येत असुन दि.२८/०९/२०२२ रोजीचा उर्वरीत भागाचा पाणी पुरवठा दि.२९/०९/२०२२ रोजी करण्यात येईल. तसेच दि. २९/०९/२०२२ रोजी व ३०/०९/२०२२ रोजीचा पाणी पुरवठा अनुक्रमे दि.३०/०९/२०२२ व ०१/१०/२०२२ रोजी करण्यात येईल. तरी नागरीकांनी याची नोंद घ्यावी. नागरीकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.