कोल्हापुरात नराधमाने संपवले कुटुंब… स्वतः पोलिसात हजर…

0

 

कोल्हापूर, लोकशाही न्युज नेटवर्क:

जिल्ह्यातील कागलमध्ये (कागल) चारित्र्याच्या (character) संशयावरून पत्नीची (Wife) हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्यानंतर पोटच्या दोन मुलांचाही निर्घृण खून करून नराधम बाप पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला.

गायत्री प्रकाश माळी (30), कृष्णा माळी (10) आणि आदिती माळी (16) अशी मृतांची नावे असून, प्रकाश बाळासो माळी (36) असे आरोपीचे (accused) नाव आहे. आरोपी प्रकाश हा कागल येथे पूर्वी होमगार्ड म्हणून काम करत होता. त्याने ती नोकरी सोडून एका साखर कारखान्यात नोकरी करतो.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी प्रकाश आणि पत्नी गायीत्रीशी वाद झाला. त्यातूनच प्रकाशने गायत्रीचा गळा आवळून खून केला व तिचा मृतदेह आतील खोलीत लपवून ठेवला. पाच वाजता मुलगा कृष्णात शाळेतून घरी आला तेव्हा प्रकाश बाहेरच्या खोलीत बसला होता. कृष्णा आतील खोलीत गेल्यावर त्याला आई जमिनीवर पडलेली दिसली. त्याने आईला उठवण्याचा प्रयत्न केला. पण ती हलत नव्हती. आईसोबत आपल्या वडिलांनी काही तरी केले आहे, हे लक्षात आल्यावर कृष्णा जोरजोरात रडू लागला. त्यामुळे संतापलेल्या प्रकाशने कृष्णाचाही गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने कृष्णाचा मृतदेह त्याच खोलीत ठेवला. आणि पुन्हा बाहेरच्या खोलीत येऊन जणू काही घडलेच नाही, अशा अविर्भावात बसला. सायंकाळी साडेसातच्या सुमारास आदिती घरी परतली. आतील खोलीत आई आणि भावाचा मृतदेह बघून तिने हंबरडा फोडला, आदिती ओरडू लागली. त्यामुळे प्रकाशने तिलाही गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला पण ती निसटली. त्यामुळे प्रकाशने स्वयंपाकघरातील वरवंटा तिच्या डोक्यात घातला. आदिती रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्यावर पुन्हा प्रकाश बाहेरच्या खोलीत येऊन बसला.

रात्री ९ च्या सुमारास प्रकाश कोष्टी गल्लीतील आपल्या भावाकडे गेला. मी बायको आणि दोन मुलांना मारून आलोय,  असे त्याने भावाला सांगितले. भावाला तो मस्करी करतोय, असे वाटले त्याने त्याला हाकलून लावले. तेथून प्रकाश कागल पोलिस ठाण्यात आला.

कागल पोलिस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी होती. त्यामुळे पोलिसांनी बाहेरचे गेट बंद केले होते. प्रकाश या गेटवर गेला आणि दरवाजा उघडा, असे पोलिसांना सांगू लागला. गर्दीमुळे पोलिसांनी प्रकाशला हटकले. दार उघडा आणि मला आत घ्या… मी बायको आणि दोन पोरांना संपवलंय… असे त्याने पोलिसांना सांगितले. तरीही पोलिसांचा त्यावर विश्वास बसला नाही. अखेर पोलिसांनी त्याला आत घेतले आणि त्याच्याकडून अधिक माहिती मिळवली. घटनास्थळी (at the crime scene) एकाच खोलीत तिघांचे मृतदेह (dead body) पाहून पोलिसही थक्क झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.