विठ्ठल भक्तांसाठी मोठी बातमी ! २ डिसेंबरपासून..

0

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

विठ्ठल भक्तांसाठी महत्वाची बातमी आहे. पंढरपुरमध्ये गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या कार्तिकी एकादशी यात्रेचा आज (शुक्रवार, १ डिसेंबर) समारोप झाला. आज पासून विठ्ठल रुक्मिणी मातेचे सर्व राजोपचार पूर्ववत झाले. भाविकांना अखंड दर्शन देऊन थकलेल्या देवाची आज मंत्रोच्चारात प्रक्षाळ पूजा संपन्न झाली. प्रक्षाळ पूजेने या कार्तिकी यात्रेची सांगता झाली. या सांगते सोबतच देवाचे २४ तास दर्शन बंद होणार आहे.

देवाच्या पायाला.. 

कार्तिकी यात्रा  काळात भाविकांना २४ तास दर्शन देण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी उभे असतात. याकाळात देवाचे फक्त काही नित्योपचार सुरू असतात. आज (१ डिसेंबर) प्रक्षाळ पूजेच्या निमित्ताने देवाला दोन वेळा उष्ण पाण्याने स्नान घालण्यात आले. या दरम्यान भक्तांना २४ तास दर्शन देऊन थकलेल्या देवाच्या पायाला लिंबू साखर चोळली जाते. दुपारी पोशाख करून देवाची विधिवत पूजा केली जाते.

आयुर्वेदिक वनस्पतींचा काढा

रात्री शेज आरतीवेळी देवाला १४ प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पतींचा काढा दाखवला जातो. या मुळे देवाला आलेला थकवा दूर होतो अशी भावना आहे. आजपासून कार्तिकी यात्रेनिमित्त सुरू ठेवलेले २४ तास दर्शन बंद करण्यात आले आहे. उद्या पासून (शनिवार, २ डिसेंबर) सकाळी सहा वाजता दर्शनासाठी मंदिर उघडले जाईल तर रात्री ११ वाजता दर्शन बंद करण्यात येईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.