बापरे ! महिला क्रिकेटपटूंमध्ये जुंपली, नाक रक्तबंबाळ..

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

पाकिस्तान क्रिकेट हे कायमच वादग्रस्त चर्चेत असते. आता सुद्धा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चर्चेत आले असून तीन महिला क्रिकेटपटूंनी निलंबित केलं आहे. पीसीबीने नुकतेच सदाफ शम्स, युसरा आणि आयेशा बिलाल या क्रिकेटपटूंनी निलंबित केलं आहे.देशांतर्गत क्रिकेटमधील तीन महिला क्रिकेटपटूंना निलंबित केल्याचं वृत्त दिलं. या महिला क्रिकेटपटू या राष्ट्रीय महिला क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. यातील एका महिला क्रिकेटपटूच्या नाकातून रक्त देखील येत होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, सदाफ शम्स आणि युसरा यांनी त्यांचीच संघसहकारी आयेशा बिलालवर हल्ला चढवला. ही घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी पीसीबीकडे एक अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली होती. पीसीबीने या तीनही क्रिकेपटपटूंवर तात्पूर्ती बंदी घातली आहे. त्यांना पुढची नोटिस मिळेपर्यंत खेळण्यापासून देखील रोखण्यात आलं आहे.

पाकिस्तान महिला क्रिकेटच्या प्रमुख तानिया मलिक या या प्रकरणी लवकरच चौकशी सुरू करणार आहे. राष्ट्रीय महिला क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये सहा विभागाचे संघ खेळतात. यात कराची, लाहोर, पेशावर, क्वेट्टा आणि रावळपिंडी या संघांचा समावेश आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.