सावधान जीरे खाताय ? सात लाखांचे बनावट जिरं जप्त, दोघांना अटक

बनावट जिरं कसे ओळखाल ?

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

सावधान तुम्ही जिरे खात असाल तर ही बातमी नक्की वाचा.  जिऱ्याशिवाय जणू काही स्वयंपाक अपूर्णच राहतो. म्हणून प्रत्येक गृहिणीकडून जिऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणावर असते, मात्र सध्या बाजारात बनावट जिरं विक्रीसाठी आले आहे. तेही बाजार भावापेक्षा अर्ध्या किमतीत बाजारात बनावट जिरे उपलब्ध आहे. केमिकलचा वापर करुन बनावट जिरं तयार करण्यात येत असल्याची माहिती समोर आलीये. हे बनावट जिरे आरोग्यासाठी अत्यंत धोकायदाक ठरु शकते.

दोन जणांना अटक

मुंबईमधील भिवंडी शहरात बनावट जिरे  विक्री करण्यासाठी आलेल्या टेम्पोवर शांतीनगर पोलिसांनी धाड टाकली असून 7 लाख 19 हजार 700 रुपये किमतीचे 2,399 किलो बनावट जिरं पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली. शादाब इस्लाम खान (वय 33) आणि चेतन रमेशभाई गांधी (वय 34) अशी या आरोपींची नावे आहेत.

असे ओळखा बनावट जिरं 

जर तुम्ही बनावट जिरं पाण्यात टाकलं तर ते मळकट रंगाचे दिसते आणि पाणीही गढूळ होते. तसेच जर खरं जिरं पाण्यात टाकलं तर ते स्वच्छ आणि पिवळसर रंगाचे दिसते. त्यामुळे जर तुम्ही जिरे खरेदी करत असाल तर बनावट जिरे अशा प्रकारे तुम्ही ओळखू शकता. यामुळे तुमची फसवणूक देखील होणार नाही.

11 लाखांचा मुद्देमाल जप्त 

शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 90 फूट रोड, नागाव फातमा नगर येथे बनावट जिरे येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस उपनिरीक्षक एस एम घुगे आणि पोलीस शिपाई क्षीरसागर यांना मिळाली होती. शांतीनगर पोलिसांनी भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केले. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी सापळा रचला आणि त्यांना टेम्पोत बनावट जिरे असल्याचे लक्षात आहे.  याच टम्पोवर कारवाई करत पोलिसांनी 80 गोन्यांमधून 7 लाख 19 हजार 700 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच सुमारे साडेतीन टन बनावट जिरे असून 4 लाख रुपये किंमतीचा टेम्पो असा एकूण 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सर्रासपणे बाजारात विक्री 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चेतन गांधी याने मे.जागृती इंटरप्राईजेस नोबेल इंडस्ट्रियल इस्टेट मनोर जि.पालघर या ठिकाणी शासनाची परवानगी न घेता बनावट जिऱ्याची फॅक्टरी सुरु केली होती. बडीशेपचा टाकाऊ हिस्सा आणि लाकूड यात केमिकल व केमिकल मिश्रित पावडरचा वापर करून हे जीरे बनवण्यात येत होते. तसेच यासाठी लागणारा कच्चा माल हा गुजरातमधून उंचा येथून येत होता. त्यानंतर बनावट जिरे बनवून पैरट या ब्रँड कंपनीच्या नावाने बाजार भावाच्या अर्ध्या किंमतीत विकला जात होता.  दुसरीकडे या पाकिटावर कोणत्याही प्रकारची एक्सपायरी डेट नसून सर्रासपणे बाजारात विक्री करण्यात येत होती. आरोपींनी मागील सहा महिन्यांहून अधिक काळापासून हा बनावट जिऱ्याचा व्यावसाय सुरु केला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.