पहूर येथे वृद्धाची आत्महत्या

0

पहूर ता. जामनेरः पहूर – कसबे येथील लेलेनगर भागातील रहीवासी प्रकाश शंकर बारी (फुसे) (वय ६०) यांनी राहत्या घरात दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दि.२ रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.
पत्नी बाजारात तर मुलगा कपाशीची गाडी भरायला गेलेला असताना घरात कोणीही नसल्याचे पाहून प्रकाश बारी यांनी घराचा दरवाजा अडकवून दोरीने गळ्यास घेतला मुलगा राहूल कपाशीची गाडी भरून घरी आल्यावर दरवाजा उघडताच त्याने वडिलांचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत पाहताच एकच हंबरडा फोडला. शेजारील रहीवाश्यांनी पोलीसांना खबर दिली. पोलीसांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली असून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. उद्या सकाळी शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार केले जाणार असून मयत प्रकाश बारी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, २ मुली असा परिवार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.