महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यु

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

आज सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान भडगाव आय.टी.आय. जवळ भरधाव ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मनोज अजबसिंग पाटील (वय १७, रा. नाचनखेडा. ह. मु. जयकिसान कॉलनी) याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याच्या सोबत असलेला दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.

मनोज भडगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा विद्यार्थी होता. सकाळी पाचोरा येथून आय.टी.आय. ला जात असतांना ही घटना घडली. नाचनखेडा येथील शेतकरी कुंटूंबातील मनोज शिक्षणासाठी पाचो-याला काकांकडे रहात होता. शिवाय फावल्या वेळेत कॉलेज चौकातील पुर्ति शॉपजवळ दुध विक्रीचे काम करायचा.

अतिशय मनमिळावू व सुस्वभावी मनोज कुटुंबात आणि मित्र वर्गात अतिशय प्रिय होता. त्याच्या अकस्मात मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच विकासाच्या नावाने सुरू असलेले धोकादायक रस्ते मृत्यूचा सापळा बनल्याने नागरिक संताप व्यक्त करित असून या बेलगाम वाहतूकीमुळे सुरू असलेले अपघाताचे सत्र केव्हा थांबणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.