शाहिरांचे घर, प्रशासकीय मदतीवाचून अद्यापही वाऱ्यावर

0

शाहीर शिवाजीराव पाटील यांची प्रचंड नाराजी

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क
येथील खानदेश लोकरंग फाउंडेशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र शाहीर परिषदेचे राज्य संघटन प्रमुख तथा खानदेशातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या चार दशकापासून आपल्या दर्जेदार शाहिरीने समाजाचे निरपेक्ष प्रबोधन करणारे ज्येष्ठ शाहीर समाजभूषण श्री शिवाजीराव पाटील नगरदेवळा यांचे सन – २०२१ मध्ये अतिवृष्टीच्या काळात स्थानिक राहते घर पावसाने पडले होते.
. त्यादरम्यान महाराष्ट्रातील काही लोक कलावंतांनी थोडफार अर्थसाहाय्य करून शिवाजीराव पाटील यांना तात्पुरता मदतीचा हात दिला होता पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी शाहिरांना स्थानिक तालुक्याचे कलावंत या नात्याने मनापासून सहकार्य केले . तसेच आमदार मंगेश चव्हाण आणि आमदार राजू भोळे यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही लोकप्रतिनिधीने शाहीर शिवाजीराव पाटलांना मदत केली नाही . परंतु जिल्हा प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी शाहिरांच्या मदतीकडे दुर्लक्ष केले याची खंत शिवाजीराव पाटील यांना आहे . तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व तात्कालीन सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी मदतीचा ठोस आश्वासन दिले मात्र ते देखील हवेत विरले त्यानंतर त्यानंतर शाहीर शिवाजीराव पाटील यांनी प्रत्यक्ष मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मदतीचा प्रस्ताव दिला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील प्रस्ताव दिला तसेच सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खरगे यांच्याकडे देखील प्रस्ताव दिला मात्र केवळ कागदपत्रे आश्वासने देऊन अद्याप पर्यंत कलावंतांना मदतीपासून वंचित ठेवले जात आहे..

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शाहीर शिवाजीराव पाटील यांना सुधीर मुनगंटीवार यांनी शाहीर शिवाजीराव पाटील यांच्या नवीन घर बांधकामासाठी आर्थिक सहाय्य बद्दलचे जिल्हा अधिकारी यांच्या नावाने पत्र दिले व प्रत्यक्ष तात्कालीन प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांना मुंबईतून फोन देखील केला शाहीर पाटील यांनी ते पत्र जिल्हाधिकारी यांना दोन ते तीन वेळेस दिले जिल्हाधिकारी यांच्यामार्फत संबंधित पत्र तहसीलदार यांच्याकडे आले तेथे सुद्धा निराशा प्रशासनाचे म्हणणे आहे की, अशी कोणतीही तरतूद मदतीची आमच्याकडे उपलब्ध नाही त्यामुळे शाहीर शिवाजीराव पाटील यांनी प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड संताप व्यक्त केला असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी बाबत देखील प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे कोरोना काळामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रघुवीर खेडकर यांना भरघोस मदत दिली मात्र स्थानिक जिल्ह्यातील कलावंतांच्या दुरावस्थेकडे पालकमंत्र्यांचे लक्ष नाही कलावंतांच्या हितासाठी झटणारे पालकमंत्री स्थानिक कलावंतांना देखील सहकार्य करू शकत नाही अशी खंत शाहीर पाटील यांनी व्यक्त केली तसेच जळगाव जिल्ह्यात दोन कॅबिनेट मंत्री असून शाहीर पाटील यांना दोन वर्षात केवळ पत्राने भुलवून मदतीपासून वंचित ठेवले आहे यामुळे शिवाजीराव पाटील जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी बाबत मनापासून नाराजी व्यक्त करीत आहेत कलावंतांबद्दल कोणतीही जाणीव खानदेशातील लोकप्रतिनिधींना नसून केवळ कलावंतांचा वापर आपापल्या सोयीनुसार व्यासपीठावर करण्यासाठी मंत्री, पुढारी वारंवार फोन करतात हे देखील शाहीर पाटील यांनी आपल्या नाराजी मध्ये व्यक्त केले आहे.

शाहीर शिवाजीराव पाटील यांचे वय आज सत्तरीकडे असून गेल्या वर्षभरापासून ते नगरदेवळा येथे भाड्याच्या घरात राहत आहेत गावातील एका कलावंताने शाहीर पाटील यांना अल्प दरात ८०० स्क्वेअर फुट जागा उपलब्ध करून दिलेली आहे मात्र या जागेच्या बांधकामासाठी लागणारा खर्च कसा आणि कुठून उपलब्ध करावा हा प्रश्न शाहीर पाटील यांना पडलेला आहे निरभवलेल्या सरकारबाबत शाहिरांची नाराजी ही मोठ्या प्रमाणावर असून आता तरी सरकारला जाग येईल का असा प्रश्न शाहीर पाटील आज विचारत आहेत.

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.