गावठी कट्ट्यासह दोघांना पोलिसांनी केले जेरबंद

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क 

तालुक्यातील पुनगाव शिवारातुन एका गावठी कट्ट्यासह दोघांना पोलिसांनी सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले आहे. विनापरवाना शस्त्र बाळगण्याची ही परिसरातील आठवड्यातील दुसरी घटना उघडकीस आल्याने परिसरात गुंडगिरी बोकाळत असल्याची सद्यस्थितीत परिस्थिती निर्माण होतांना दिसत आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक देखील केले जात आहे.

तालुक्यातील पुनगाव येथे एका इसमाजवळ गावठी बनावटीचे पिस्टल असल्याची गुप्त माहिती २० सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पाचोरा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी तात्काळ पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे यांना कॅबिनमध्ये बोलवुन पोलिस हेड कॉन्स्टेबल विश्वास देशमुख, पोलिस काॅन्स्टेबल योगेश पाटील, पो. काॅ. संदिप भोई, प्रकाश शिवदे यांचे पथक तयार करत घटनास्थळी रवाना केले.  पुनगाव शिवारातील महादेव मंदिराचे अलिकडे पोल्ट्री फार्मजवळ दोन इसम फिरत असल्याचे निदर्शनास येताच पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे यांनी पथकासह सापळा रचत दोन्ही इसमांना ताब्यात घेत त्यांची झडती घेतली.

त्यातील राहुल अनिल परदेशी (वय २७) याचेजवळ गावठी बनावटीचे पिस्टल आढळुन आले. दरम्यान पथकाने त्यांना विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्यांना ताब्यात घेवुन पोलिस स्टेशन मध्ये आणले. पोलिस काॅन्स्टेबल प्रकाश शिवदे यांच्या फिर्यादीवरून २० हजार रुपये किंमतीचे एक काळ्या रंगाचे त्यावर काळे हॅण्डग्रीप असलेले गावठी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) त्यास ट्रिगर दबलेले व रिकामी तसेच विना स्प्रिंगची मॅगझिन तिची मागील पट्टी निघालेले असे शस्त्र अनाधिकृतपणे बाळगल्याने राहुल अनिल परदेशी (वय २७) व रामचंद्र गोपीचंद परदेशी (वय ३७) दोन्ही रा. पुनगाव ता. पाचोरा यांचेविरूद्ध भाग – ६ गु. र. नं. ३४७ / २०२३ भारतीय हत्यार कलम ३ / २५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहे. एकीकडे या धडक कारवाईमुळे पोलिसांचे अभिनंदन व कौतुक केले जात असतांनाच आठवडाभरातच अग्निशस्त्र बाळणाऱ्यांना जेरबंद करण्याची ही दुसरी घटना असुन ऐन सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी बोकाळत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.