वरखेडी डांभुर्णी रस्त्यात गावाजवळ मुख्य बाजारपेठ जवळ भला मोठा खड्डा

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

वरखेडी येथून डांभुर्णी हा रस्ता जातो त्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने वरखेडी गावाजवळ बाजार पेठ मध्ये मला मोठा खड्डा पडलेला आहे. त्यामुळे सध्या या खड्ड्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. गावातील बाजारात जाताना याच रस्त्यावरून जावे लागते. या गावातील मुख्य रस्ता असल्याने या खड्ड्यातूनच मार्गक्रम करून जावे लागते. ग्रामस्थांना या रस्त्यावरील चिखल व मोठ्या खड्ड्याचा भरपूर त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थ फार वैतागले आहेत. या खड्ड्यातून व पिंपळगाव रस्त्यापासून भोकरी गावापर्यंत ह्या रस्त्यावर लहान मोठे अनेक खड्डे असून सर्व दूर चिखल असून, यातून वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी या ठिकाणी मोटरसायकली तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या सायकली यांचे रोज लहान-मोठे अपघात होत असतात. तर प्राथमिक आरोग्य केंद्र या मार्गावरून जावे लागते. यातही रुग्णांना हाल सहन करून जावे लागते तसेच, या वरखेडी डांभुर्णी रस्त्याचे काही वर्षे पूर्वी पंतप्रधान ग्राम सडक योजना अंतर्गत काम झालेले होते. परंतु वरखेडी गावापासून जवळ या डांभुर्णी रस्त्या लागत एक राईस (तांदूळ ) मिल सुरू झाली व त्याच्या ओव्हर लोडींग वाहनाची वरदळ वाढली. यात रस्ता पूर्ण खराब झाला म्हणून त्याने तो दुरुस्त करून द्या अशी त्याला मागणी केली. त्या राईस मिल वाल्याने दुरुस्ती तर सोडा पण रस्त्याची जास्त दुरावस्था करून टाकली आहे. वरखेडी डांभुर्णी ह्या गावातील मुख्य रस्ता असून, या रस्त्याच्या बाजूला दर गुरुवारी आठवडे बाजार भरतो प्राथमिक आरोग्य केंद्र जाण्यासाठी शाळेत जाण्यासाठी हा एक रस्ता असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देऊन काम करावे कारण की या रस्त्यावरती गाव दरवाजा असल्याने पोळा, बारा गाड्यांचा कार्यक्रम होतो. तरी लवकरात लवकर या रस्त्याचे काम करण्यात यावे अशी ग्रामस्थांची व वाहनधारकांची मागणी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.