सॅनिटायझर पिल्याने एकाचा मृत्यू; अकस्मात मृत्यूची नोंद

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील शिवकॉलनी येथे एकाने सॅनिटायझर पिल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

शहरातील शिवकॉलनी येथील रहिवासी मंगलसिंग रामदास इंगळे (वय ५५) हे कुटुंबीयांसह राहतात. मंगलसिंग इंगळे यांनी शनिवारी (दि. १६) दुपारी घरात असलेले सॅनिटायझर प्राशन केले. दरम्यान त्यांना अत्यवस्थ वाटत असल्याने नातेवाइकांनी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

यावेळी त्यांचा उपचारादरम्यान सायंकाळी मृत्यू झाला. आत्महत्या करण्याचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी शनिवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक नीलेश पाटील करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.