विद्यापीठात ‘ट्रान्सजेंडर आणि माध्यमे’ विषयावर उद्या कार्यशाळा

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळा आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स, मिनीस्ट्री ऑफ सोशल जस्टीस अॅन्ड एम्पावरमेंट, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने दि.14 फेब्रुवारी 2023 रोजी ‘ट्रान्सजेंडर अॅन्ड मीडिया’ या विषयावर विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे प्रशाळा सभागृहात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यशाळेचे उद्घघाटन सकाळी 10.00 वाजता सामाजिक कार्यकर्त्या शमिभा पाटील यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ.विनोद पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स विभागाचे सल्लागार संजय पवार उपस्थित राहणार आहे. एक दिवसीय कार्यशाळेत चार सत्र होणार असून ज्येष्ठ विधीतज्ज्ञ अॅड.सुशील अत्रे हे ‘ट्रान्सजेंडर संदर्भातील संवैधानिक तरतूदी आणि महत्वपूर्ण न्यायालयीन निवाडे’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. ‘ट्रान्सजेंडर आणि शासकीय योजना’ या विषयावर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, ‘ट्रान्सजेंडर आणि सामाजिक दृष्टीकोन’ याविषयावर भुसावळचे सामाजिक कार्यकर्ता चंद्रकांत चौधरी तर ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी हे ‘ट्रान्सजेंडर आणि माध्यमे’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेचा समारोप दुपारी 4.30 वाजता वित्त व लेखाधिकारी सीए.रवींद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नोंदणी अनिवार्य असून दि. 14 रोजी सकाळी 9.30 ते 10.00 या वेळेत विनामूल्य नोंदणी करता येईल. या कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक तथा कार्यशाळेचे मुख्य निमंत्रक प्रा.डॉ.सुधीर भटकर, सहनिमंत्रक डॉ.गोपी सोरडे, डॉ.सोमनाथ वडनेरे, डॉ.रोहित कसबे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.