राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय, वाचा सविस्तर

शिवडी ते न्हावाशेवा दरम्यान टोल फक्त २५० रुपये

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शिवडी ते न्हावाशेवा दरम्यान टोल ५०० ऐवजी २५० रुपये करण्यात आलेला आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या वतीने हे बांधकाम झाले आहे. एमएमआरडीएच्या प्रस्तावानुसार ५०० रुपयांचा टोल प्रस्तावित केला होता. मात्र नगर नगर विकास विभागाने यात हस्तक्षेप करून तो ३५० रुपयांवर आणला होता.

शिवडी ते न्हावाशेवा पूल सुमारे २२ कि.मी. लांबीचा प्रकल्प आहे. ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू’ असे प्रकल्पाचे नामकरण प्रकल्पाच्या १७ हजार ८४३ कोटी रुपयांच्या खर्चास सरकारकडून मान्यता देण्यात आली.

महत्वाचे मुद्दे…

* २१ हजार २०० कोटी रुपये खर्चाचा आणि पाण्यावर २२ किलोमीटर लांबीचा देशातील सर्वात जास्त लांबीचा उड्डाण पूल

म्हणून ओळख

* प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, लवकरच हा सागरी सेतू वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

* प्रकल्पावर झालेला खर्च वसूल कारण्यासाठी ३० वर्षांसाठी पथकर आकारण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.