नाईट क्लबमध्ये भीषण आग, 13 ठार, 35 जखमी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज शुक्रवारी सकाळी थायलंडची राजधानी बँकॉकच्या आग्नेयेला चोनबुरी (Chonburi) प्रांतातील एका नाईट क्लबला भीषण आग (Thailand Nightclub Fire)लागली. या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 35 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती बँकॉकच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

पोलीस कर्नल वुटीपॉन्ग सोमजाई यांनी दूरध्वनीवरून सांगितले की, सट्टाहिप जिल्ह्यातील माउंटन बी नाईट (Mountain Bee Pub) क्लबमध्ये सकाळी 1.00 वाजता आग लागली. आगीत मृत्युमुखी पडलेले सर्व नागरिक हे थाई असल्याचे सांगितले जात आहे.

बचाव सेवेने पोस्ट केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये काही नागरिक क्लबमधून किंचाळत पळत असल्याचे दिसून आले आहे, प्रचंड आग लागल्याने त्यांचे कपडे पेटले गेले.क्लबच्या भिंतींवर ज्वालाग्राही ध्वनिक फोममुळे आग वाढली आणि ती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाला तीन तासांपेक्षा जास्त वेळ लागला.

मृतांमध्ये चार महिला आणि नऊ पुरुषांचा मसावेश आहे. बहुतेक लोकं प्रवेशद्वाराजवळ आणि बाथरूममध्ये आढळले त्यांचे शरीर गंभीरपणे जळले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. फ्लू टा लुआंग पोलीस स्टेशनचे पोलीस लेफ्टनंट कर्नल बूनसॉन्ग यिंगयोंग यांनी, ज्या ठिकाणी आग लागली त्या भागाचे निरीक्षण करणारे पोलीस लेफ्टनंट कर्नल बूनसॉन्ग यिंगयोंग यांनी फोनवरून एएफपीला हि माहिती दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.