नीरज चोप्राने रोवला देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारतीय भालाफेकू नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) पुन्हा एकदा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा लॉसने डायमंडलीग (Lausanne Diamond League) मध्ये पहिलं स्थान पटकावला आहे… त्याने ८७.६६ मीटर अंतरावर भालाफेक करून पाहिलं स्थान पटकावत भारताचं नाव मोठं केलं आहे. या मोसमातील त्याचा हा सलग दुसरा विजय असून यापूर्वीही निरजनं दोहा डायमंड लीगमध्ये ८८.६७ मीटर भाला फेकून पहिला क्रमांक पटकावला होता.

नीरज चोप्रानं यंदाच्या मोसमात उत्तम कामगिरी केली आहे. नीरज ५ मे रोजी दोहा डायमंड लीग नंतर इतर कोणत्याही स्पर्धेत सहभागी होऊ शकला नव्हता कारण या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या एफबिके गेम्स आणि पावो नूरमी गेम्स या दोन्ही स्पर्धांवरून नीरजनं दुखापतीमुळे माघार घेतली होती….

दोहा डायमंडलीगमध्येही ठरला चॅम्पियन
नीरज चोप्राने २०२३ च्या मोसमाची धमाकेदार सुरुवात करून भारताचे नाव उंचावल आहे. सोबतच दोहा डायमंडलिग (Doha Diamond League) मध्ये त्याने शानदार विजयाची नोंद केली आहे. या स्पर्धेत निरजने विक्रमी ८८.६७ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक (gold medal) आपल्या नावे केलं होतं. टोक्यो ऑलम्पिक मध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देत नीरजनं इतिहास रचला होता. भालाफेक मध्ये सुवर्ण जिंकणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. या यशानंतर नीरजचा अद्भुत प्रवास सुरू आहे यावर्षी त्याने डायमंड लीग जिंकून इतिहास रचला आणि तो जागतिक पातळीवर नंबर एक चा भालाफेकपटू बनला आहे.

भालाफेकमध्ये नीरज चोप्रा ‘नंबर वन’
दोहा येथे आयोजित डायमंड लीग जिंकल्यानंतर नीरजनं भालाफेकच्या क्रमवारीत आणखी एक यश मिळवलं आई. २२ मी रोजी तो नंबर १ चा खेळाडू बनला होता यासह नीरज चोप्रानं पुन्हा एकदा इतिहास रचून भातातच नाव उंचावलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.