मलिकांच्या अडचणीत वाढ ; 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणी ईडी (ED) कोठडीत असलेले महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना आता 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पीएमएलए न्यायालयाने नवाब मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

यापूर्वी नवाब मलिक (Nawab Malik) हे ईडीच्या कोठडीत होते. मात्र, आजच्या सुनावणीदरम्यान ईडीने नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यास हरकत नसल्याचे सांगितले. मात्र, चौकशीसाठी त्यांच्या कोठडीचा कालावधी वाढवून मागितला.

विशेष न्यायालयाने ही मागणी मान्य करत नवाब मलिक यांना २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. परंतु, नवाब मलिक यांच्या वकिलांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर संध्याकाळपर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता उच्च न्यायालयात काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

ईडीने नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी चौकशीनंतर ताब्यात घेतले होते. यावरून महाराष्ट्रातील राजकारण प्रचंड तापले आहे. भाजपकडून अधिवेशनात सातत्याने नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली जात आहे. न्यायालयाने नवाब मलिक यांच्या कोठडीची मुदत वाढवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकासआघाडीच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे नवाब मलिक यांची चौकशी अपूर्ण राहिली असल्याचे कारण सांगत ईडीने विशेष न्यायालयाकडे मलिक यांच्या ईडी कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाला केली. आरोपी सरदार शहवली खान याने दिलेल्या जबाबातील तपशीलाविषयी चौकशी केल्यानंतर नवाब मलिक यांनी काही माहिती दिली, त्याअनुषंगाने आम्हाला त्यांची अधिक चौकशी करायची आहे. त्याचबरोबर या प्रकरणात आम्ही आणखी काहींचे जबाब नोंदवले आहेत, त्याअनुषंगानेही मलिक यांची अधिक चौकशी करायची आहे, असे ईडीतर्फे अनिल सिंग यांनी कोर्टाला सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.