याला म्हणतात व्यापारी; नानखटाई विकून व्यक्तीने घेतली ५० लाखांची कार…(व्हिडीओ)

0

 

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

कोणतेही काम लहान नसते फक्त स्वतःच्या कामाचा आदर करा. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही स्वतःच्या कामातून पैसे कमवत असाल तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. हे केवळ म्हणण्यापुरते नाही तर या व्यक्तीने सिद्धही केले आहे. या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो नानखटाई विकताना दिसत आहे.

नानखटाई विकून गाडी घेतली

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक फूड ब्लॉगर नानखटाई विकणाऱ्या व्यक्तीकडे येतो आणि त्याला विचारतो की ही फॉर्च्युनर तुमची आहे का? नानखटाई विकणारी व्यक्ती ती आपलीच असल्याचं पूर्ण आत्मविश्वासाने सांगते. यानंतर, फूड ब्लॉगर म्हणतो, माझा विश्वास बसत नाही, तेव्हा नानखटाई विक्रेता त्याला सांगतो, बघा, माझ्याकडेही त्याची चावी आहे, तुम्ही म्हणाल तर मी तुम्हाला दाखवतो. यानंतर व्हिडिओमध्ये नानखटाई विक्रेता फॉर्च्युनरमध्ये बसलेल्या दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Chahat Bhalla (@officialsahihai)

लोकांचा यावर विश्वास बसत नाही

हा फॉर्च्युनर नानखाताई विक्रेत्याचा आहे की नाही याची आम्ही पुष्टी करत नाही. @officialsahihai नावाच्या युजरने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तर अनेकांनी व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत. नानखाताई विक्रेत्याच्या कमाईवर अनेकांचा विश्वास बसत नाही. व्हिडिओमध्ये दिसणारी कार 50 लाखांची नसून 7-8 लाख रुपयांची असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.