निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले यांना जामीन मंजूर

0

जळगाव :- मराठा समाजाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे जळगाव गुन्हे शाखेचे निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले यांना शुक्रवारी जळगाव न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. एक लाख रुपयांचा जात मुचलका भरण्यास व कोर्टात चार्जशी दाखल होईपर्यंत पोलिसात हजेरी देणे, साक्षीदारांना धमकावू नये, पुराव्यांशी छेडछाड करू नये या अटीवर न्या.विनय मुगळीकर यांनी जामीन मंजूर केला.

मराठा समाजाविषयी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने किरणकुमार बकाले यांना निलंबित व्हावे लागले होते शिवाय विनोद देशमुख यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात बकाले यांच्याविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यात बकाले यांचा शोध सुरू असताना तब्बल दिड वर्षांपासून ते पोलिसांना चकवा देत होते मात्र सोमवार, 15 जानेवारी 2024 रोजी पोलिस यंत्रणेपुढे बकाले हे शरण आले होते. बकाले यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना बुधवारी व्हीसीद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली व नंतर बकाले यांच्या वकिलामार्फत जामिनासाठी अर्ज करण्यात आल्यानंतर शुक्रवारी बकाले यांना जामीन मंजूर करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.