नगरदेवळा येथे धावत्या रेल्वेतून पडुन इसमाचा मृत्यू

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील नगरदेवळा रेल्वे स्टेशन जवळ अज्ञात रेल्वेतून पडून ३५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना दि.२२ रोजी रात्री घडली. याबाबत भडगाव पोलिस सटेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या बाबत रेल्वे स्टेशन मास्टर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ रोजी नागरदेवळा याठिकाणी एका अज्ञात पुरुषाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाला आहे. या पुरुषाचे वय (अंदाजे) ३५ वर्ष असल्याचे समजत आहे. याबाबत स्टेशनमास्तर यांनी पोलीस सटेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत पुढील तपास पो.हे.कॉ संजयकुमार पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.