वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मोठी घोषणा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सोई सुविधेचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकरी वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी जाहीर केला आहे.

आजच्या या बैठकीत मुख्य सचिव आणि इतर अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे. तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही मुख्य सचिवांना दिले.

कोरोनाच्या कारणास्तव वारीत खंडन पडले होते. त्यामुळे यावर्षी अधिक वारकरी या वर्षी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य, स्वच्छता यावर भर देण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना दिल्या आहेत. अपघात होणार नाही, यासाठी विशेष काळजी घेण्याच्या सूचना सर्व यंत्रणांना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.