अखेर मानवी तस्करी प्रकरणी रोखलेलं विमान ४ दिवसांनी मुंबईत दाखल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मंगळवारी मुंबई विमानतळावर वेगळच थरारनाट्य रंगल्याच पाहायला मिळालं. मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रान्सनं रोखलेलं विमान तब्बल ४ दिवसानंतर मंगळवारी मुंबईत परतलं. आहे. २५ डिसेंबरला या विमानाचं पॅरिसच्या वाट्री विमानतळावरून उड्डाण झालं आणि मंगळवारी पहाटे ४ वाजता ते मुंबईच्या धावपट्टीवर लँड झालं. PTI या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार या विमानातून २७६ प्रवासी मुंबईत आले.

मुंबई विमानतळावर पोहोचताच या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सीआयएसएफनं चौकशीसुद्धा केली. काही प्रवाशांना माध्यमांच्या प्रतिनिधींना गाठलं आणि त्यांची विचारपूस करण्यास सुरुवात केली. हे सर्व पाहून प्रवाशांनी मात्र तिथून पळ काढला.

सोमवारी दुपारी हे विमान भारतात येन अपेक्षित होत. पण, यामधील काही प्रवाशांनी भारतात येण्यास नकार देत फ्रान्समध्येच शरण मागितली होती. ज्यामुळे वातावरण चिघळले आणि भारताच्या दिशेनं होणार उड्डाण टाळले. २२ डिसेंबरला फ्रान्समधील विमानतळावर इंधन भरण्यासाठी हे विमान पोहोचताच तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती मिळाली.

Leave A Reply

Your email address will not be published.