मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देणारे शरद पवार जातीवादी कसे ? – मुकुंद सपकाळे

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठवाडा विद्यापीठाचे ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ” असा नामविस्तार करून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा नामांतराचा विषय धर्मांध आणि जातीवादी शक्तीचा रोष पत्करून सत्ता गेली तरी चालेल असा निर्धार करत मराठवाडा विद्यापीठास डॉ.बाबासाहेब आबेडकरांचे नाव देणारे शरद पवार जातीवादी कसे ? असा सवाल करत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे आपल्या भाषणात म्हणाले की “ऍड. प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, रा. सु. गवई, प्रा. जोगेंद्र कवाडे इत्यादी नेत्यांना सर्व शक्तीनिशी निवडून आणत संसदेत पाठवले, तर भटक्या विमुक्त जातीमध्ये जन्मास आलेले लक्ष्मण माने यांना आमदार केले, असे शरद पवारांचे राजकीय व सामाजिक चारित्र्य जातीवादी असुच शकत नाही.

सत्ता वंचित व संधी वंचित अशा अठरा पगड जाती, बाराबलुतेदारांसह दलित, आदिवासींना सत्तेत सामावुन घेतलं, अशा बहुजन समाजाच्या राष्ट्रीय नेत्याला बदनाम करण्याचा व जातीवादी ठरविण्याचा कट येथील जातीवादी पक्ष व धर्मांध पक्ष करीत आहे आणि शरद पवारांची प्रतिमा मलिन करीत आहे. या कृतीचा महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या अजिंठा विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत निषेध करण्यात आला.

सदर बैठकीत छत्रपती शाहु महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्ताने जळगाव जिल्ह्यात शाहू महाराजांच्या कर्तृत्वाचा इतिहासाचा जागर करण्यासाठी 100 व्याख्याने आयोजित करण्याचा संकल्प करण्यात आला. सदर बैठकीचे प्रस्ताविक रमेश सोनवणे यांनी केले व सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन अमोल कोल्हे यांनी केले.

सदर बैठकीस मुकुंद सपकाळे, दिलिप सपकाळे, अमोल कोल्हे, हरिश्चंद्र सोनवणे, रमेश सोनवणे, चंदन बिऱ्हाडे, पंकज सोनवणे, महेंद्र केदारे, वाल्मिक सपकाळे, भारत सोनवणे, शिरीष तायडे, सुरेश तायडे, संजय सपकाळे, साहेबराव वानखेडे, गौतम सपकाळे, प्रांजल नेमाडे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.