शिर्डीत साईंची काकड आरती भोंग्याविना; भक्तांमध्ये नाराजी

0

शिर्डी, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात सध्या भोंग्यांवरून चांगलेच वातावरण तापले आहे. राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर राज्यातील सगळ्या धार्मिकस्थळांना पोलिसांनी नोटिसा दिल्या आहेत. याचा फटका शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरालाही बसला आहे. साईबाबांची होणारी पहाटे ५ वाजताची काकडी आरती आणि रात्री १०.३० होणारी शेजाआरती आता भोंग्याविना होणार आहे. पोलिसांनी सकाळी ६ ते रात्री १० वाजता भोंग्याला परवानगी दिली असल्याने, भोंग्याविना होणाऱ्या आरतीमुळे भक्तांमध्ये काहीशी नाराजी आहे.

दरम्यान ३ मे ला शिर्डी पोलीसांनी साईबाबा संस्थानला पत्राद्वारे सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानुसार रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत भोंगा वापरण्यास परवानगी नसल्याने साईमंदीरावरील लाऊडस्पीकर वापरु नये, असे आदेश दिल्याने ३ मे या दिवशी रात्री साईमंदीरात करण्यात आलेली शेजारती आणि ४ मे या दिवशी पहाटेची काकड आरती भोंग्यावरुन प्रसारीत करण्यात आली नाही. दरम्यान कोर्टाच्या आदेशाचे पालन साईमंदीरात पालन केले जाणार असल्याच साई संस्थानच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंगे आणि यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण याविषयी आवाज उठविल्यावर आज मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पहाटेची अजान भोंग्यांचा वापराशिवाय झाली. कुर्ला येथील एससीएलआर जवळील विभागात ३ ते ४ मोठ्या मशिदी आहेत. यामुळे इथे पहाटे ६ च्या अगोदर मोठ्या आवाजात अजान होत असते. मात्र, आज या विभागात नमाज पठण झाले. पण लाउडस्पीकरवर अजाण झाली नाही. दरम्यान, मुंबईमधील काही मोठ्या मशिदीच्या ट्रस्टींनी एकत्र येत पहाटेची अजान स्पीकरवर न करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.