कर्जबाजारीपणाला कंटाळून वयोवृध्द शेतकर्‍याची आत्महत्या

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील पिंप्रीभोजना येथील एका वयोवृध्द शेतकर्‍याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आपल्या शेतातच आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली.

पिंप्री भोजना येथील परबत रूपा कोळी (वय ७०) यांच्यावर कर्ज होते. तसेच त्यांनी काही दिवसांपूर्वी पेरणी केली असली तरी पाऊस न आल्यामुळे ते काही दिवसांपासून प्रचंड नैराश्यात होते. यानंतर आज पहाटे त्यांचा मृतदेह हा शेतात आढळून आला. त्यांनी काही तरी विषारी द्रव्य प्राशन केल्याचे आढळून आले.

परबत कोळी यांचा मृतदेह ह शवविच्छेदन करण्यासाठी रूग्णालयात पाठविण्यात आला होता. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.