आ. चंद्रकांत पाटील यांनी केला आदिवासी पाड्यावर होलिकोत्सव साजरा

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क
सातपुडा पर्वतरांगांमध्ये सध्या होलिकोत्सवाची धूम सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यांतील जोंधनखेडा , हिवरा, उमरा, बोरखेडा जुने, नवे, धामणगाव मोरझिरा व टाकळी या गावातील विविध पाडे, वाड्या आणि वस्त्यांवर वास्तव्यास असलेल्या भटक्या आदिवासी तसेच बंजारा समुदायात दरवर्षी होळीचा सण मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला जातो. आदिवासी बांधवांच्या होळी सणाचे प्रमुख आकर्षण म्हणजे ‘भोंगऱ्या बाजार’. या भोंगऱ्या बाजारात खऱ्या अर्थाने आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडते.

यावर्षी देखील ठिकठिकाणी भोंगऱ्या बाजार भरविण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळं सातपुडा पर्वतरांगांमध्ये होलिकोत्सवाच्या आनंदावर विरजण पडलं होतं, अगदी साध्या पद्धतीनं हा सण साजरा झाला, पण यावर्षी कोरोनाचा संसर्ग नसल्यानं होलिकोत्सवाची धूम सुरु असून आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह होलिकोत्सव साजरा केला. आणि धुली वंदनचा आनंद लुटला .

यावेळी आदिवासी व बंजारा समाजातील लोकगीत व नृत्य यामुळे परिसरात होलिकोत्सव सण किती आत्मीयतेने साजरा केला जातो हे दिसून येत होते.
यावेळी माजी तालुका प्रमुख छोटू भोई, माजी उप तालुका प्रमुख नवनीत पाटील, शिवाजी (कोळी) पाटील , माजी विभाग प्रमुख विनोद पाटील, किशोर पाटील, सूर्यकांत पाटील, इम्रान खान , जावेद खान, ज्ञानेश्वर पाटील, अविनाश वाढे,नगरसेवक मुकेशचंद्र वानखेडे, निलेश शिरसाट, संतोष मराठे, संतोष कोळी, स्वीय सहायक प्रवीण चौधरी, प्रकाश गोसावी, अनिकेत भोई, सोपान मराठे, रितेश सोनार, गौरव दुट्टे आदींची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.