मुक्ताईनगर येथे ‘नेहरू युवा केंद्र जळगाव’ च्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत चालणारे नेहरू युवा केंद्र जळगाव व नेचर हार्ट फाउंडेशन खिर्डी बु.ता.रावेर तसेच जे. ई. स्कूल व ज्यु. कॉलेज मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जे. ई. स्कूल मुक्ताईनगर च्या क्रीडांगणावर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. सदर क्रीडा स्पर्धा तालुक्यातील 15 ते 29 वयोगटातील युवक व युवतींसाठी घेण्यात आल्या. सदर स्पर्धेत मुलांकरिता कब्बडी, होलीबॉल, 100 मी. धावणे, व शॉट पुट हे खेळ तर युवतींन करिता होलीबॉल, 100 मी. धावणे, व शॉट पुट हे खेळ घेण्यात आले. साधारण तहा तालुक्यातील 150 युवक युवती यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला.
क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मुक्ताईनगर तालुक्याच्या तहसीलदार श्वेता संचेती मॅडम यांनी केले तसेच उद्घाटन प्रसंगी विचार तालुक्याचे नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, प्राचार्य आर पी पाटील, कॉलेज तर्फे स्पर्धेचे समन्वयक एस. डी. कुरकुरे, नेचर हार्ट फाऊंडेशन चे अध्यक्ष ॲड. एस. डी. कोचुरे, एस. जे. मोरे सर, एम आर. चौधरी सर पर्यवेक्षक एस. पी. राठोड, भोळे सर हे उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी मा. तहसीलदार श्वेता संचेती म्हणाले की, नेहरू युवा केंद्राचा हा स्तुत्य उपक्रम असून सदर खेळाच्या माध्यमातून युवकांमध्ये खेळाविषयी प्रेरणा निर्माण होईल व युवकांचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल. सदर क्रीडा स्पर्धेत कब्बडी मध्ये प्रथम क्रमांक चारठाना येथील अक्षय झनके याचा संघाने मिळवला, तर द्वितीय क्रमांक अंतूर्ली येथील प्रफुल्ल मेढे चा संघ. तर तृतीय क्रमांक जे. ई. स्कूल व ज्यु. कॉलेज मुक्ताईनगर च्या संघाने पटकावला. तर पुरुष हॉलीबॉल या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आदित्य बोदळे यांच्या संघाने तर, द्वितीय क्रमांक अंतुरली येथील प्रफुल्ल मेढे यांच्या संघाने, तर तृतीय क्रमांक कृष्णा माळी यांच्या संघाने पटकावला.

महिला हॉलीबॉल मध्ये प्रथम क्रमांक पूजा बोदळे हिच्या संघाने, तर द्वितीय क्रमांक सुजाता मोरे हिच्या संघाने पटकावला. तसेच पुरुष 100 मी. धावणे च्या स्पर्धेमध्ये क्रमांक गोपाळ अशोक सपकाळे द्वितीय क्रमांक नागेश लक्ष्मण वाघोळे तर, तृतीय क्रमांक विजय प्रल्हाद गवळी यांनी मिळवला तसेच महिला 100 मीटर धावणे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक चारठाणा येथील वैष्णवी आत्माराम सुरळकर हिने तर द्वितीय क्रमांक कल्याणी विनोद पाटील हिने मिळवला. तसेच तृतीय क्रमांक शिवानी संजय धामोडे हिने पटकावला.

शॉट पुट या खेळा मध्ये पुरुष गटात प्रथम क्रमांक आशिष तायडे, द्वितीय क्रमांक गोपाळ अशोक सपकाळे, व तृतीय क्रमांक अल्केश पंढरीनाथ चौधरी यांनी मिळवला. तसेच शॉट पुट या खेळात महिला गटामध्ये प्रथम क्रमांक जे. ई. स्कूल ची विद्यार्थिनी वैष्णवी श्रीकृष्ण रत्नपारखी, द्वितीय क्रमांक पूजा मिलिंद बोदडे, तृतीय क्रमांक प्राजक्ता भालशंकर यांनी मिळवला. सर्व विजेत्या संघांना व स्पर्धकांना ट्रॉफी मेडल्स व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. सदर क्रीडा स्पर्धेचे कामकाज नेहरू युवा केंद्र जळगाव चे जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर व लेखापाल अजिंक्य गवळी यांच्या मार्गदरशनाखाली मुक्ताईनगर तालुका समन्वयक दीपक खिरोडकर व निकिता मेढे यांनी पाहिले तसेच सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. एस. डी. कोचुरे यांनी तर आभार कुरकुरे यांनी मानले सदर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी बंटी जहुरे, प्रफुल्ल मेढे, निलेश मेढे यांनी प्रयत्न केले.

Leave A Reply

Your email address will not be published.