लेव्हलिंग मशीनमध्ये पाय अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सोनेगाव-बेला रस्त्याचे सिमेंट काँक्रीटचे काम सुरु आहे. या कामावरील लेव्हलिंग मशीनने दहेली येथील शेतकऱ्यास मुरूम पसरवणाऱ्या ग्रेडर मशीनने वीस फूट फरफटत नेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. भाऊराव पांडुरंग आंबुलकर (वय ७०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

भाऊराव हे बुधवारी (दि. १७) शेताकडे जात असताना (एमएच-३१-एफई ३३८५) या क्रमांकाच्या मशीनने भाऊराव यांना २० फूट फरफटत नेले. त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. रस्त्याचे काम अभी कंट्रक्शन कंपनी करीत आहे.

एकाच वेळी दोन्ही बाजूने खोदकाम व मुरूम टाकण्याचे काम सुरू असल्यामुळे लहान मोठ्या वाहनांना वाहतूक करणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे दररोज अपघाताच्या किरकोळ घटना घडत आहेत. अपघाताचे वृत्त समजताच दहेली येथील संतप्त नागरिक घटनास्थळी गोळा झाले होते. परंतु पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळली.

Leave A Reply

Your email address will not be published.