मुलीच्या लग्नाचा उडणार होता बार; आईचं प्रियकरासह पसार…

0

 

हरिद्वार, लोकशाही न्यूज नेटवर्क:

काही कथानक हे चित्रपटाला शोभणारे असतात, त्यावर अगदी हिट असा चित्रपट तयार होऊन धमाल उडवून देतो. काही वर्षांपूर्वी प्रेमी युगुलांवर आलेला सैराट सर्वांच्याच लक्षात आहे. अशीच एक घटना उघडकीस आली आहे. मात्र इथ प्रकरण थोड अजब आहे.

आपल्या पोटच्या मुलीचं लग्न अवघ्या १० दिवसांवर असतांना आईनेच चक्क आपल्या प्रियकरासोबत धूम ठोकली आहे. सोबत जातांना तिने दागिनेही लंपास केले. मुलीचं लग्न अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपलं. संपूर्ण घरात लगीनघाई सुरू होती. वधू आणि वर पक्षाकडून दाग-दागिन्यांची खरेदी सुद्धा झाली. अशातच आपल्याकडे कुणाचं लक्ष नाही, याचा फायदा घेत मुलीच्या आईने आपल्या प्रियकरासोबत धूम ठोकली. एवढंच नाही तर जाताना तिने सोन्या-चांदीचे दागिनेही लंपास केले आहेत. उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यातून ही अजब घटना समोर आली आहे.

लग्नाची तारीख 14 डिसेंबर ठरली होती. घरात अगदी आनंदाचं वातावरण होतं. पाहुण्यांची वर्दळही वाढली होती. अशातच घरात लग्नसराईचे वातावरण असतानाच, मुलीची आई मात्र तिच्या कुटुंबियांना सोडून अचानक घर सोडून तिचा प्रियकर राहुल याच्यासोबत पळून गेली. एवढंच नाही तर जाताना तिने मुलीच्या लग्नात देण्यासाठी आणलेले सोन्या-चांदीचे दागिनेही लंपास केले.

अचानक रात्री महिला घरातून फरार झाल्याने कुटुंबीयांना शंका आली, त्यांनी याबाबत तपास केला असता, ती आपल्या प्रियकरासोबत फरार झाली असल्याचं नातेवाईकांना समजलं. त्यानंतर नातेवाईकांनी घराची झडती घेतली असता लाखो रुपयांचे दागिनेही गायब झाल्याचे आढळून आले. या संपूर्ण प्रकारानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला आणि तिचा प्रियकर एकाच कंपनीत काम करत होते. त्यामुळे दोघांचेही एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. या काळात त्यांचे सूत जुळले आणि त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. सध्या पोलिसांकडून दोघांचाही शोध सुरू आहे. मुलीचे लग्न 10 दिवसांवर असताना आईच प्रियकरासोबत पळून गेल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी महिलेसह तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून दोघांचाही शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरिद्वारमधील मंगलौर परिरसरात राहणाऱ्या एका 38 वर्षीय महिलेच्या मुलीचे लग्न ठरले होते. या महिलेला 3 मुली आणि एक मुलगा असून वर्षभरापूर्वी तिच्या पतीचं निधन झालेलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.