रोझलँड प्रकल्पाच्या इंग्रजी संभाषण कौशल्य वर्गाची गरुडझेप

0

मोहरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

कै.पुंडलिकराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मोहरा. तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद (Aurangabad) येथे सॅनरोझ फाऊंडेशन, टालाहासी, राज्य -फ्लोरिडा, अमेरिका यांच्या वतीने दि. ७ जानेवारी २०२३ रोजी रोझमिन खिमानी प्रधान मेॅडम यांनी मोहरा येथील विद्यार्थांना इंग्रजी संभाषणाला बद्दल मार्गदर्शन केले.आपल्या दिवंगत आई दौलत खिमानी मॅडम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक कार्य सुरू केले आहे.
प्रभावी इंग्रजी संभाषण कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, व्यावहारिक ग्रामर, आत्म परिचय,शिष्टाचार,शिक्षक-विदयार्थी यांचे नाते, क्रिएटिव्ह राईटींग इन इंग्लिश, इ. असे अनेक उपक्रम त्या यशस्वीरीत्या राबवित आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ही तत्वे मार्गदर्शक ठरत असून ग्रामीण भागातील विद्यार्थी, इंग्रजी सारख्या कठीण वाटणाऱ्या विषयात आपली रुची दाखवत आहे. विद्यार्थिनींनी रोझमिन खिमानी प्रधान यांना नुतन वर्षाच्या शुभेच्छा देऊन स्वहस्तलिखित भेटकार्ड दिले. यावेळी शाळेचे प्राचार्य संतोष शिंदे, बाळु घुगे, श्याम पवार, भगवान थोरात, विष्णु क्षिरसागर, सतिश काळे, अनिल गायकवाड, सुधाकर निकम, अप्पासाहेब आघाडे, विरेद्र खंबाट, सुरेश काकडे व ज्ञानेश्वर अदबाने यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन पाटील, सुत्रसंचालन अतुल घडमोडे तर आभार प्रदर्शन सतिष काळे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.