राज्यपाल रमेश बैस करणार मार्गदर्शन
जळगाव ;- शासकीय मेडिकल कॉलेजच्या पहिला पदवी समारंभ मंगळवार दि. 16 एप्रिल 2024 रोजी संभाजीराजे नाट्यगृहात साजरा होत असून यावेळी राज्यपाल रमेश बैस हे दृश्रकाव्य प्रणालीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत. जळगाव येथे शासकीय मेडीकल कॉलजची स्थापना झाल्यानंतर हा पहिलाच पदवी समारंभ (Commemoration Education Ceremony ) होत आहे.
जिल्हा मेडीकल कॉलजचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी यासंदर्भात सांगितले की, मेडीकल कॉलजचा हा पदवी समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस हे यावेळी दृश्रकाव्य प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी उपकुलपती माधुरी कानेटकर, दिनेश वाघमारे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.