नवीन मतदार नोंदणीसाठी व्होटर हेल्पलाईन उपयुक्त

0

मतदारांनी ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जळगाव;- नवीन मतदारांना घरबसल्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी व इतर निवडणूक विषयक सुविधा मिळविण्यासाठी वोटर हेल्पलाईन ॲप उपयुक्त आहे.

भारत निवडणूक आयोगाद्वारे तयार केलेले हे ॲप डाऊनलोड करून घ्यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे. कोणत्याही शासकीय कार्यालयात न जाता सदर ॲपच्या मदतीने नवीन मतदारांना घरबसल्या मतदार यादीत नाव समाविष्ट करणे शक्य आहे. अथवा अस्तित्वात असलेले मतदार यादीतील नावात दुरूस्ती व फोटोंमध्ये बदल ही करता येतो. मयत मतदाराचे नावे नातेवाईक वगळणी देखील करू शकतात.‌ तसेच घरपोच मोफत मतदान ओळखपत्र‌ ही मिळवता येणार आहे.

गुगल प्ले स्टोअर वरील
https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen या लिंकच्या माध्यमातून हे ॲप डाऊनलोड करून या सुविधेचा लाभ घ्यावा. असे आवाहन ही श्री.मित्तल यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.