लोकशाही न्यूज नेटवर्क
मासिक पाळीमध्ये अनेक महिलांना पोटदुखी, पाठदुखी आणि क्रम्प्सचा भयानक त्रास होत असतो. काहीजण हा त्रास सहन करतात तर काही महिला त्रास थांबण्यासाठी गोळ्यांचा आधार घेतात. लंडनमधील एका १६ वर्षीय मुलीनेही मासिक पाळीतील दुखणे कमी करण्यासाठी अशीच वेदनाशमक गोळी घेतली. मात्र ते घेणं तिच्या जीवावर बेतले आहे. त्या गोळ्या घेतल्यानंतर अवघ्या ३ आठवड्यातच तिचा त्रास वाढला. डॉक्टरांच्या तपासणी दरम्यान तिच्या पोटात कीड असल्याचे सापडले. तसेच रक्त गोठल्याने तिचा ४८ तासांतच मृत्यू झाला.
मृत मुलीची मावशी जेना ब्रेथवेट यांनी सांगितले की, “ती रविवारी रात्री पासून खूप अस्वस्थ होती. आम्हाला सोमवारी सकाळी डॉक्टरांची भेट घ्यावी लागली कारण तिला दर अर्ध्या तासाने उलट्या होत होत्या”, मात्र त्यानंतरसुद्धा ती बराच वेळ आजारीच होती. तिच्या पोटात जंत असल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला. मात्र असे असले तरी, नो रेड फ्लॅग स्थिती असल्याचे नमूद केले. मात्र बुधवारपर्यंत अशीच स्थिती राहिल्यास तिला हॉस्पिटलमध्ये न्या, असे त्यांनी सांगितले. मात्र, तिची प्रकृती आणखीनच बिघडल्याने ती वेदनेने ओरडू लागली. कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला, परंतु ती बाथरूममध्ये पडली आणि तिच्या पायाला दुखापत झाली. तिची मावशी आणि काकूने तिला रुग्णालयात नेण्यासाठी कारमध्ये बसवले पण तिने रिस्पॉन्स देणे बंद केले.