आता आकाशात उडणारी कार येणार !

0

गुजरात, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तुम्ही रस्त्यावर चालणारी कार पहिलीच आहे आता आकाशात उडणारी कार येणार आहे. देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाने बुधवारी व्हायब्रंट गुजरातमध्ये फ्लाइंग कारचे कॉन्सेप्ट मॉडेल शोकेस केले. यासोबतच कंपनीने आपल्या आगामी इलेक्ट्रिक कार ईव्हीएक्सचे कॉन्सेप्ट मॉडेलही प्रदर्शित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हायब्रंट गुजरातमध्ये दाखवण्यात आलेल्या मारुतीच्या फ्लाइंग आणि ईव्हीएक्स इलेक्ट्रिक कारची ही पाहणी केली.

मारुती सुझुकी इंडियाने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या ऑटो एक्स्पो 2023 मध्ये आपली अपडेटेड प्रोटोटाइप इलेक्ट्रिक कार ईव्हीएक्स देखील प्रदर्शित केली होती. याशिवाय 29-31 ऑक्टोबर 2023 रोजी टोकियो येथे झालेल्या जपान मोबिलिटी शोमध्ये सुझुकीने ही ईव्हीएक्स सादर केली होती. विशेष म्हणजे मारुती सुझुकी इंडियाने भारतात फ्लाइंग कार सेवा सुरू करण्याची इच्छा व्यक्त करत व्हायब्रंट गुजरातमध्ये फ्लाइंग कारचे कॉन्सेप्ट मॉडेल देखील प्रदर्शित केले.

मारुती ईव्हीएक्सची किंमत ?

भारतात टेस्टिंग दरम्यान मारुती ईव्हीएक्स पुन्हा एकदा कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यावेळी ही गाडी चार्जिंग स्टेशनवर चार्जिंग करताना दिसली आहे. मारुती ईव्हीएक्स एप्रिल 2025 पर्यंत भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. मारुती ईव्हीएक्सची किंमत 25 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते, असा अंदाज आहे. ही 5 सीटर कार आहे, ज्यात पाच प्रवासी बसू शकतात.

मारुती ईव्हीएक्स इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये 60 किलोवॅट बॅटरी पॅकसह ड्युअल मोटर सेटअप देण्यात येणार आहे. कंपनीचा दावा आहे की, हे वाहन 550 किलोमीटरची रेंज पार करण्यास सक्षम असेल. या इलेक्ट्रिक कारमध्ये मोठा कनेक्टेड स्क्रीन सेटअप, वायरलेस फोन चार्जिंग आणि 360 डिग्री कॅमेरा असे फीचर्स दिले जाऊ शकतात. लाँच झाल्यानंतर ही कार ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक आणि एमजी झेडएस ईव्हीला टक्कर देईल. महिंद्रा एक्सयूव्ही 400 ईव्ही आणि टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिकपेक्षा हा अधिक प्रीमियम ऑप्शन असेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.