Monday, August 15, 2022

विवाहितेचा पाच लाखासाठी छळ; ५ जणांवर गुन्हा

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

जळगावातील चिंचोली येथील माहेर असलेल्या विवाहितेचा पाच लाख रुपयांसाठी छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या ५ जणांवर एमआयडीसी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

मध्यप्रदेशातील भोपाळ येथील सुनील अशोक गोसावी यांच्यासोबत चिंचोली येथील काजल सुनील गोसावी यांचा विवाह झाला. लग्नानंतर काही दिवसांनी पतीसह सासरच्या मंडळींनी काजलकडे माहेरुन पाच लाख रुपये आणावेत व संसारपयोगी साहित्य आणावे अशी मागणी केली.

यासाठी पतीसह सासरच्यांनी काजलचा दोन वर्ष मानसिक आणि शारिरीक छळ केला. हा छळ सहन न झाल्याने काजल ह्या माहेरी निघून आल्या. याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून याप्रकरणी बुधवारी काजलचे पती सुनील अशोक गोसावी, अशोक प्रल्हाद गोसावी, हिराबाई अशोक गोसावी, विद्या सचिन गोसावी, वर्षा पुरूषोत्तम पाटील सर्व रा गोविंदपुरा, हुजरआण्णानगर, भोपाळ, मध्यप्रदेश या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गफूर तडवी हे करीत आहेत.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या