शेतातून बैलगाडी नेल्याच्या कारणावरून एकाला लाकडी काठीने बेदम मारहाण

0

पारोळा;- बैलगाडी शेतातून शेतातून नेल्याच्या कारणावरून एकास लाकडी काठीने मारहाण करून दुखापत केल्याचा प्रकार तालुक्यातील चोरवड शिवारात घडला असून याप्रकरणी एका विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की भालचंद्र लखीचंद पाटील वय 45 राहणार मंगरूळ तालुका पारोळा हे शेती व्यवसाय करीत असून त्यांनी 18 रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास संशयित धोंडू साहेबराव पाटील राहणार मंगरूळ तालुका पारोळा यांच्या शेतातून बैलगाडी नेली असता धोंडू पाटील याला वाईट वाटून त्याने भालचंद्र पाटील यांना लाकडी काठीने बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली. याबाबत भालचंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास साहेब फौजदार दीपक वाघ करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.